Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते श्रीमती हायस्कूलमध्ये वेदांता संगणक लॅबचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : वेदांता फाऊंडेशनच्या पुढाकाराने आणि ‘वृद्धी’ प्रकल्पाचा एक भाग म्हणून, मूल्यवर्धित सेवेने (व्हीएबी)  श्रीमती हायस्कूल, वेळगी यांच्याशी हातमिळवणी करून अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, कोडिंग आणि संगीत या विषयातील अद्ययावत अभ्यासक्रम प्रदान करणे सुलभ व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याचा ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन गोव्याचे माननीय मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण बांदोडकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यतीन काकोडकर, श्रीमती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, चित्रा परांजपे, सीएसआर, व्हीएबीचे प्रमुख, प्रसाद आजगावकर, शिक्षक, विध्यार्थी तसेच सेसा गोवा आणि वेदांता फाउंडेशनचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

संगणक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, श्रीमती हायस्कूल, वेळगी येथील विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर लॅब सुरू केल्याबद्दल, मी वेदांताचे अभिनंदन करतो. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार आयटी आधारित शिक्षण घेण्यास मदत होईल. ग्रामीण भागात ई-लर्निंगच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि संगणकाशी संबंधित विविध प्रकारची साधने आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल.

सेसा गोवाचे सीईओ, नवीन जाजू म्हणाले, मला विश्वास आहे, श्रीमती हायस्कूल, वेळगी येथे स्थापन करण्यात आलेली आमची १४ वी संगणक प्रयोगशाळा, ग्रामीण भागात आयटी शिक्षणाला चालना देण्यास आणि आमच्या तरुणांच्या अद्भुत क्षमतेला समोर आणण्यास मदत करेल. वेदांता सेसा गोवा, अनिल अग्रवाल फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली, केंद्रीत कार्यक्रमांद्वारे संगणक साक्षरता आणि भविष्य घडविण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. सेसा टेक्निकल स्कूलमध्ये चालवल्या जाणाऱ्या आमच्या संगणक प्रयोगशाळा, सेंटर आणि आयटी अभ्यासक्रमांमधला अभ्यासक्रम, आयटी-सक्षम तरुणांचा समूह तयार करण्यास मदत करत आहे, जे पुढे जाऊन #ViksitBharat चे नेतृत्व करतील.

श्रीमती हायस्कूलमधील संगणक प्रयोगशाळा, अत्याधुनिक संगणक प्रणालींनी सुसज्ज आहे. ही लॅब विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक साधनांच्या श्रेणीवर अनुभव आणि व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी आणि ते विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. यात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील अद्ययावत प्रगतीची माहिती मिळावी आणि भविष्यातील शैक्षणिक व करिअर संधींसाठी त्यांनी उत्तम प्रकारे तयार होता यावे, म्हणून योग्य अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

श्रीमती हायस्कूलच्या शिक्षिका, बिंदीया म्हणाल्या, वेदांताने आम्हाला १० संगणक दिले आहेत.  मला विश्वास आहे, की याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रॅक्टिकल दरम्यान खूप फायदा होईल. विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल आणि त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.  तसेच त्यांना त्यांचे प्रॅक्टिकल उत्तम प्रकारे करण्यास मदत होईल. हे संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल मी वेदांताचे आभार मानते.

श्रीमती हायस्कूलमधील संगणक प्रयोगशाळा ही गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अशा प्रकारची १४वी सुविधा आहे. या लॅबने मुला-मुलींसह ५,०००+ तरुणांचे भविष्य बदलण्यास आणि त्यांच्या प्रगतीसाठी मदत केली आहे.

व्हीएबीचे सीईओ, सप्तेश सरदेसाई यांनी या प्रकल्पाबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, आम्हाला या प्रगत संगणक प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी श्रीमती हायस्कूल, वेळगी यांच्याशी सहकार्य केल्याचा खूप अभिमान वाटतो. व्हीएबीमध्ये, जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे.  हा उपक्रम विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, कोडिंग आणि संगीत यातील आवश्यक कौशल्ये देऊन सुसज्ज करतो तसेच कौशल्य-आधारित समाजाला घडविण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत देखील आहे.  आम्ही #TransformingCommunities साठी वचनबद्ध असून #ViksitBharat साठी काम करत आहोत. एकत्रितपणे, आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी उज्ज्वल व अधिक नाविन्यपूर्ण भविष्य घडवू शकतो.