गोवा खबर : रंगभूमीदिनाचे औचित्य साधून 12 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता रंगकर्मी, नाट्यगायक संजय धुपकर यांचा पेडणे येथील भवगती हायस्कूल सभागृहात सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
नाट्यक्षेत्रातील आद्यपुरूष ब्र. कृष्णाभट बांदकर स्मृतीप्रीत्यर्थ सम्राट क्लब इंटरनॅशनलतर्फे दरवर्षी रंगभूमीदिन साजरा करण्यात येतो. सम्राट क्लबचे प्रत्येक स्थानिक तालुकावार क्लब या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्थानिक कलाकाराची निवड करतात. सम्राट क्लब पेडणे टाऊनतर्फे 12 रोजी धुपकर यांचा सत्कार होणार आहे.
समाजसेवक विठ्ठल प्रभुदेसाई या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. सर्व कलाप्रेमी रसिकांनी या सत्कार समारंभास उपस्थित राहावे, असे सम्राट क्लब पेडणे टाऊनच्या अध्यक्ष प्रिया टांकसाळी यांनी कळवले आहे.
