गोवा खबर:गोव्याचे पर्यावरण, वन आणि वन्यजीव नष्ट झाले आहेत. म्हादईवर भाजपने तडजोड केली आहे. बेरोजगारी वाढली आहे, इंधनाचे दर आणि वीज दर परवडत नसलेल्या पातळीवर पण भाजप आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पूर्णपणे मौन बाळगून आहेत. भाजपने मूळ मुद्द्यांवरून लक्ष वळवणे थांबवावे,अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.