गोवा खबर:शिरोडा मतदारसंघातील वीज, पाणी आणि रस्त्याची कामे लवकरच पूर्ण केली जाणार आहेत. येथील नागरिकांचे आरोग्य आणि शिक्षण यालाही महत्त्व दिले जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या सहकार्याने राज्यात आणि पर्यायाने शिरोडा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. साधनसुविधा, विकासकामांचा धडाका तसेच शिरोडावासीयांचे आरोग्य व येथील युवांचे शैक्षणिक भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी केंद्रात पुन्हा एकदा श्री. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची गरज आहे. यासाठी दक्षिण गोव्यातून भाजपच्या उमेदवार सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो यांना विजयी करा, असे आवाहन शिरोड्याचे आमदार तथा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी येथे केले.
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी शुक्रवारी शिरोडा मतदारसंघात प्रचार दौरा केला. दिगावाडा पंचवाडी येथील श्री पाईक देवस्थान येथे प्रार्थना करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. रायचेमळ पंचवाडी येथे कोपरा सभा आटोपून सौ. धेंपो यांनी बडेगाळ चॅपल पंचवाडी येथे नागरिकांशी चर्चा केली. शिगमोमांड पंचवाडी येथे कोपरासभेत हजेरी लावल्यानंतर त्यांनी दुपारी श्री लक्ष्मेश्वर मंदिर मुदई पंचवाडी येथे आशीर्वाद घेतले. यानंतर सौ. धेंपो यांनी कोपरा सभांचा धडाका लावत तळपणे येथील श्री साळपेश्वर मंडप, संध्याकाळी कलमामळ बोरी, देऊळवाडा बोरी आणि श्री नारायण मंदिर येथे जनतेला संबोधित केले. शिरोडा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यावेळी त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी भाजपाचे आमदार तथा जलस्रोत मंत्री श्री. शिरोडकर यांच्यासह भाजपच्या शिरोडा मंडळाचे अध्यक्ष श्री. सूरज नाईक, सरचिटणीस श्री. अवधूत नाईक, विस्तारक श्री. विनय गावकर, वास्को मंडळाचे अध्यक्ष श्री. दीपक नाईक, श्री. अमीर नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्री. नारायण नाईक, सरपंच सौ.लीना फर्नांडिस, उपसरपंच श्री. पावलो गुदिन्हो, पंच सौ. लिबी सिल्वेरा, श्री. रामा नाईक, श्री. क्रिस्टिव्ह डिकॉस्ता आदी उपस्थित होते.
केंद्रातील श्री. नरेंद्र मोदी सरकारच्या साहाय्याने गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार विविध विकासकामे व योजना राबवत आहे. भाजपा सरकारने जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने पूर्ण केली असून पुढील कार्यकाळात जाहीरनाम्यातील 100% आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले आहे. परंतु यासाठी सर्वांनी भाजपाला मत देऊन श्री. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन सौ. धेंपो यांनी यावेळी केले.