Connect with us

गोवा खबर

कळंगुट मधील पर्यटन विकासाची कामे श्रीपाद नाईक यांच्यामुळेच:मायकल लोबो

Published

on

Spread the love
गोवा खबर: श्रीपादभाऊंनी उत्तर गोव्यात केलेली विकासकामे वेगळी सांगायला नकोत. कळंगुट समुद्रकिनारी टॉयलेट्स ब्लॉक, टिटोज लेनमध्ये टॉयलेट्स ब्लॉक, कांदोळी समुद्रकिनारी गार्डन, पार्किंग लॉट, आग्वाद किल्ल्याची डागडुजी, २८ कोटींचे जेल संग्रहालय इ. विकास प्रकल्प हे केंद्राकडून मिळालेल्या निधीतून उभारण्यात आले आहेत. हे सर्व शक्य झाले श्रीपादभाऊ केंद्रीयमंत्री असताना. किनारी भागात एवढी विकासकामे करणे खूप कठीण होते. मात्र भाऊंच्या प्रयत्नातून ते शक्य झाले. भविष्यातही किनारी भागातील लोकांचा विकास करण्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे. किनारी भागातील अनेक घरांना बेकायदा ठरवत आज सीआरझेड अंतर्गत नोटीसा आल्या आहेत. ही घरे कायदेशीर करण्यासाठी आम्हाला श्रीपादभाऊंची मदत लागणार आहे. त्यासाठी श्रीपादभाऊंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊया, असे आवाहन कळंगुटचे आमदार श्री. मायकल लोबो यांनी केले.  
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी कळंगुट मतदारसंघात प्रचार दौरा केला. यावेळी बागा येथी खुरीस चॅपेलला भेट दिल्यानंतर परिसरात घेतलेल्या कोपरा बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.
सलग ५ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम श्रीपादभाऊंनी केला आहे. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तमरित्या कामगिरी बजावली आहे. आज भाजपाने उत्तर गोवा लोकसभा उमेदवार म्हणून श्रीपादभाऊंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. भाजपाने दिलेल्या उमेदवारावर विश्वास ठेवलेले अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक आज या ठिकाणी श्रीपादभाऊंना पाठिंबा देण्यासाठी हजर आहेत, असे श्री. लोबो यांनी सांगितले.
यावेळी श्रीपादभाऊ मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा विश्वास कळंगुट पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी व्यक्त केला. श्रीपादभाऊंनी उत्तर गोव्यात अनेक विकासकामे केली आहेत. कळंगुट भागात हिंदू बांधवांसाठी त्यांनी स्माशानभूमी बांधली आहे. लवकरच कळंगुटमध्ये फुटबॉल स्टेडियम उभारणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आज श्रीपादभाऊंच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी निवडून देण्याची गरज आहे, असे श्री. सिक्वेरा म्हणाले.
५ वर्षं सातत्याने उत्तर गोवा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी तुम्ही मला मदत केली आहे. तुमच्याच आशीर्वादाने आणि पाठिंब्याने मला सहाव्या वेळी लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा मी नक्कीच निवडून येईन असा विश्वास आहे. आज किनारी भागाचा विकास होऊ शकतो आहे तो केवळ केंद्राकडून मिळणाऱ्या निधीमुळे. पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने किनारी भागाचा विकास करण्यासाठी भविष्यातही या निधीची आपल्याला आवश्यकता भासणार आहे. आज राज्यात आलेले मोठमोठे विकास प्रकल्प जसे की आयुष हॉस्पिटल, मांडवी-झुवारीवरील पूल, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे केंद्राचे राज्यासाठी गिफ्ट आहे. पूर्वी आपल्या देशाला गरीबांचा देश म्हणून हिणवले जायचे. मात्र श्री. नरेंद्र मोदींनी देशात जी विकासाची लाट आणली आहे, त्याने देशाचा दर्जा उंचावला आहे. मुद्रा योजना, स्टार्टअप्स इ. योजना हे मोदी सरकारची दूरदृष्टी आहे. ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवा आहे, असे श्री. नाईक म्हणाले.
सकाळी १० वाजता पर्रा येथील चर्च आणि श्री गणपती मंदिरात प्रार्थना करून श्री. नाईक यांनी कळंगुट मतदारसंघात त्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर नागवा – हडफडे येथे आयोजित कोपरा बैठकीला त्यांनी संबोधित केले. दुपारी बागा येथे खुरीस चॅपेलला भेट दिल्यानंतर श्री शांतादुर्गा मंदिराजवळ, मदार येथील तिवाई वाडो, कांदोळीचे सरपंच आणि पंच सदस्य, जेट्टी आणि सायपे-कांदोळी येथे आयोजित कोपरा बैठकीतून त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा पाठिंबा मागितला.
या प्रचार दौऱ्याच्या वेळी श्री. नाईक यांच्यासोबत कळंगुटचे आमदार श्री. मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार सौ. दिलायला लोबो, माजी झेडपी आणि कळंगुटचे माजी सरपंच श्री. शॉन मार्टिन्स, पर्राचे सरपंच श्री. चंदनंद हरमलकर, पर्राचे उपसरपंच श्री. डॅनियल लोबो, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष श्री. महानंद अस्नोडकर, उत्तर गोवा भाजपा सरचिटणीस श्री. गुरुदास शिरोडकर, कळंगुटचे झेडपी सदस्य श्री. दत्तप्रसाद दाभोळकर, पंच सदस्य, प्रभाग सदस्य आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.