Connect with us

गोवा खबर

गोव्याचे अस्तित्व राखण्यासाठी आता आरजीच पर्याय

Published

on

Spread the love
गोवेकरांना भेडसावणारे ज्वलंत विषय सोडविण्यात काँग्रेस – बीजेपी अपयशी:मनोज परब
गोवा खबर:राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाने सुद्धा जोर धरला असून, पहिल्या टप्प्यातील घरोघरी प्रचार थोड्याच जावी राहिला असून, मार्केटमध्ये जाऊन हस्तांदोलन करून दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. काल रविवारी सुद्धा उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पणजी मार्केट मध्ये आपला प्रचार करून, लोकांना ह्यावेळी बदल घडून आणून गोवेकरांचा आवाज दिल्लीत पोहचविण्याची विनंती केली.
राज्यात म्हादयी नदी, बेरोजगारीचा, जमिनी हक्क, गोवेकरांचे स्वतःच्या मालकीचे घर त्याचबरोबर इतर मूलभूत हक्क अधिकार यासारखे भेडसावणारे ज्वलंत विषयावर आजतागायत काँग्रेस आणि बीजेपी खासदारांनी कधीच दिल्लीमध्ये आवाज उठविला नाही. आजपर्यंत ते विषय रेंगाळत राहिले आहे.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा ह्या लोकसभा प्रचारादरम्यान गोवेकराकडून उत्सपूर्त प्रतिसाद मिळत असून, जनतेच्या भेटी गाठी दरम्यान स्वतः जनताच यावेळी बदल गरजेचं असून, आता आर.जी. पक्षच गोवा गोवेकरांचे अस्तित्व राखण्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे जनताच सांगत असल्याचे मनोज परब म्हणाले.
ह्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील जनता इतिहास घडवणार असून, रेव्होलुशनरी गोवन्स पक्क्षाकडे मोठ्या विश्वासाने बघत आहे. आर.जी. पक्षाच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत गोव्यातील विषय, गोवेकरांचा आवाज पोहोचविण्यासाठी गोव्यातील जनता आतुर असल्याचेही मनोज परब यांनी म्हटले.