गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना, विशेषत: ख्रिश्चन बांधवांना दिव्य प्रसंगी ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ईस्टर येशू ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरुत्थानाचे स्मरण करतो.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात “ईस्टर म्हणजे प्रेम आणि आनंद वाटून घेण्याची वेळ आहे. सध्याच्या काळात, येशूंचे उदात्त सद्गुण आणि मूल्ये आपल्याला अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी शक्ती देतात त्याचबरोबर मानवी मुल्यांना प्रोत्साहन देतो.
ईस्टर आम्हा सर्वांना आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला बळ देण्याची आणि आजच्या जीवनात आपण इतरांसाठी काय करू शकतो याचे स्मरण करून देतो. या दिवशी, आपण इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची आणि इतरांना सक्षम करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याची शपथ घेऊया. गोव्याच्या या सुंदर राज्यात राहून आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवा समाज निर्माण करूया.


Goa Tourism Department
पर्वरीत आज शिगमोत्सव!
ईस्टरचा सण आशेने आणि सहानुभूतीने आपली मने उजळून टाकू आणि सलोख्याच्या भावनेने दुर्बल आणि वंचितांची सेवा करण्यात आनंद मिळविण्यास प्रवृत्त करो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.