Connect with us

गोवा खबर

बांदोडकर पणजी जिमखाना ओपन  २०२४’ टेनिस स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published

on

Spread the love

 

~स्पर्धेसाठी एकूण १४४ स्पर्धकांची नोंदणी.

 

~ ही राज्य मानांकन टेनिस स्पर्धा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांच्या स्मृतीस समर्पित आहे.

 

गोवा खबर: बांदोडकर पणजी जिमखाना ओपन २०२४ या राज्य मानांकन स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीसाठी १४० हुन अधिक नोंदण्या आल्या आहेत. स्पर्धा १ एप्रिल पासून सुरु होणार आणि ती प्रतिष्ठित पणजी जिमखानाच्या टेनिस कोर्टवर खेळली जाणार आहे.

 

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांना सन्मान म्हणून गोवा राज्य टेनिस असोसिएशन आणि डीबी बांदोडकर अँड सन्स समूहाच्या पाठिंब्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत १४४ टेनिसपटूंनी या स्पर्धेसाठी भाग घेतला आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Goa Tourism Department
पणजीत आज शिगमोत्सव!

३७ स्पर्धकांनी १४ वर्षाखालील गटात भाग घेण्यासाठी नोंदणी केली आहे, ज्यामध्ये २५ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे, १८ वर्षाखालील गटात १६ मुले आणि ११ मुलींनी नोंदणी केली आहे. मिश्र दुहेरी गटासाठी १८ जोड्यांनी नोंदणी केली आहे, तर पुरुष दुहेरी स्पर्धेसाठी २०  जोड्यांनी नोंदणी केली आहे. तसेच महिला आणि पुरुष एकेरी गटात अनुक्रमे १५ महिला टेनिसपटू आणि ५० पुरुष टेनिसपटूंनी नोंदणी केली आहे.

 

अनुभवी गटात, ४५+ अनुभवी एकेरीसाठी ४५+ १४ नोंदण्या प्राप्त झाल्या आहेत, तर १२ जोड्यांनी अनुभवी ४५+ दुहेरी गटासाठी नोंदणी केली आहे , १२ स्पर्धकांनी  ५५+ अनुभवी साठी नोंदणी केली आहे तर ५५+  दुहेरीसाठी सहा संघ आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

 

“बांदोडकर पणजी जिमखाना ओपन २०२४  च्या पहिल्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, ही आपल्या गोवा समुदायामध्ये टेनिसबद्दलची वाढती आवड दर्शवते. टेनिस लवकरच गोव्याच्या क्रीडा संस्कृतीत रुजले जाईल अशी आमची इच्छा आम्ही आखतो,” से राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे नातू आणि स्पर्धेचे समर्थन करणाऱ्या डीबी बांदोडकर अँड सन्स ग्रुपचे संचालक समीर काकोडकर म्हणाले.