गोवा खबर:भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्दोग मंडळाने गोवा सरकारच्या उद्दोग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाखाली कार्यरत असलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्दोग सुविधा केंद्राच्यावतीने राज्यांत सूक्ष्म आणि लघु उद्दोगांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची दखल घेवून केंद्राला एमएसईएफसी उत्कृष्टता पुरस्कार- २०२३ प्रधान केला.
२९फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. आंबेकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजीत पुरस्कार वितरण समारंभास सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्दोग मंत्री श्री. नारायण तातू राणे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) श्री दीपक वर्मा, सीआयएमएसएमईचे अध्यक्ष श्री. मुकेश मोहन गुप्ता हे यावेळी उपस्थित होते.

उद्दोग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाचे प्रतिनिधी श्री प्रतिक पी. परब आणि चार्टर्ड अकाउंटंट, एमएसइएफसी गोव्याचे सदस्य श्री एन जे प्रभुदेसाई यांनी मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारला.
गोवा सूक्ष्म आणि लघु उद्दोग सुविधा केंद्र राज्यांत सूक्ष्म आणि लघू उद्दोगांना प्रोत्साहन देण्यासाठी मौल्यवान योगदान देते. तसेच तडजोड आणि मध्यस्थीच्या प्रक्रियेव्दारे थकबाकी वसूल करण्यास चांगले काम करते. २०२२-२०२३ या काळांत १११ अर्जांविषयी तडजोड आणि मध्यस्थी करून १०.४१ कोटींची थकबाकी वसूल करण्यास मदत केली आहे.
एमएसई फॅसिलिटेशन मंडळाच्या अध्यक्षा एग्ना क्लीटस, आयएएस, बँक मॅनेजर (एसबीआय) श्री गोपाळ केरकर, चार्टर्ड अकाउंटंट श्री नारायण जे. प्रभुदेसाई, जीएसआयएचे प्रतिनिधी श्री रोहित झांट्ये, ॲड. गॅलिलिओ फ्रान्सिस्को तेलीस हे सदस्य म्हणून काम पाहतात.