गोवा खबर : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत कोलवा येथे शनिवारपासून सुरू झालेल्या बीच फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी आढावा बैठक घेतली.
कोलवा येथे २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत बीच फुटबॉलचे आयोजन करण्यात आले आहे.

National Game Schedule for October 29, 2023 #NationalGamesGoa2023 #Goa
या बैठकीला स्थळ प्रमुख, गोवा क्रीडा प्राधिकरण, थॉमस कुक, गोबनाना, जीएचआरडीसी, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, कोलवा पोलिस, वाहतूक कक्ष आणि स्थानिक पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खेळांसाठी पायाभूत सुविधांच्या कामांचा एक भाग म्हणून हाती घेण्यात आलेल्या कोलवामधील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगच्या देखरेखीसाठी देखील व्हिएगस यांनी कामाच्या ठिकाणी भेट दिली..
कोलवा ग्रामपंचायतीचे पंच सदस्य आग्नेलो रॉड्रिग्ज याबददल म्हणाले की, कोलवा येथे पायाभूत सुविधांची कामे कार्यक्षमतेने व्हावीत यासाठी आमदारांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी साधली आहे.
अनेक वर्षांपासून हा भाग हॉट-मिक्स नव्हता. खेळांमुळे बराच विकास होत आहे. लवकरच आणखी रस्ते हॉट मिक्सिंगसाठी हाती घेण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.