Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे सामने पाहण्यास लोकांना प्रवेश

Published

on

Spread the love

 गोवा खबर: गोवा राज्यांत ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस सुरवात झाली असून स्पर्धा ९ नोव्हेंबर पर्यंत चालू राहील. राज्यांतील २९ क्रीडामैदान आणि स्थळांवर  विविध क्रिडा स्पर्धा होणार आहेत.

सर्व ठिकाणी लोकांना या स्पर्धा पाहण्यासाठी कोणत्याही सरकारी मान्यता ओळखपत्राशिवाय प्रवेश देण्याचा सल्ला क्रीडा सचिवांच्या कार्यालयाने दिला आहे. लोकांना सर्व क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी फक्त प्रेक्षक स्टॅण्डामध्ये प्रवेश देणार. क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि स्पर्धा पाहण्यास येणाऱ्या लोकांना प्रवेश द्यावा.