गोवा खबर : पंजाबची हरजिंदर कौर गेल्या काही काळापासून पाठदुखीशी झुंज देत आहे आणि इतर कोणत्याही भारोत्तोलकाला दुखापत चिघळण्याच्या भीतीने स्वत:ची कामगिरी उंचावणे कदाचित शक्य झाले नसते.
पण २७ वर्षांच्या या खेळाडूचे तात्कालिक ध्येय स्वत:ला नोकरी किंवा कोणत्याही प्रकारचे प्रायोजकत्व शोधणे आहे आणि यासाठीच तिला वाटते की आपली बाजू मजबूत करण्यासाठी ती प्रत्येक स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असते.
शुक्रवारी हरजिंदरने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्क विभागात ११३ किलो वजन उचलून एकूण २०१ किलो वजन उचलून ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या तृप्ती माने (१९० किलो) आणि मणिपूरच्या पी उमेश्वरी देवी (१८९ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

National Game Schedule for October 29, 2023 #NationalGamesGoa2023 #Goa
या पदकामुळे मला नोकरी किंवा प्रायोजकत्व तरी मिळेल,” अशी आशा सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने व्यक्त केली.
पतियाळा जिल्ह्यातील नाभा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हरजिंदरने २०१६ मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये स्थिरावण्यापूवी होण्यापूर्वी अथलेटिक्स आणि कबड्डीमध्ये हात आजमावला होता.
२०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळाल्यानंतर नोकरी मिळण्याची तिला अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.
हरजिंदरने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ महिलांच्या ७१ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते आणि आता तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाची आपल्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये भर घातली आहे.
हरजिंदर म्हणाली की ती तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे इथपर्यंत पोहोचली आहे परंतु याच स्थितीत किती काळ असेच चालू ठेवू शकते हे माहित नाही.
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदकापासून मी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, पण आता दीड वर्ष उलटले तरी त्या आघाडीवर कोणताही विकास झालेला नाही. पण सुदैवाने, मी राष्ट्रीय शिबिरात पोहोचले आहे जिथे माझ्या आहाराच्या सर्व गरजा योग्य प्रकारे पाळल्या जातात. हा एक अमूल्य आधार आहे, परंतु नोकरीच्या बाबतीत अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही, असे ती म्हणाली.
आपल्या दुखापतीबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘मला माझ्या पाठीची काळजी घ्यावी लागेल, हे दुखणे मला दीर्घ काळापासून त्रास देत आहे. आजही पाठीवर कडकपणा जाणवत होता. जानेवारीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करण्यापूर्वी मला पाठदुखीतून बाहेर यावे लागेल.