Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट- गोवा-२०२४चे माहितीपत्रक केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्र्यांना सादर

Published

on

Spread the love

     

 गोवा खबर: गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री माननीय प्रतिमा भौमिक यांना आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा-२०२४मध्ये सहभागासाठी स्नेहपूर्ण आमंत्रण देत या महोत्सवाच्या आयोजनाबाबतची माहिती सादर केली. या बैठकीदरम्यान गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी या उपक्रमाचे उद्दिष्ट, धोरण आणि अपेक्षित परिणाम यावरही प्रकाश टाकला.

याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी गोवा राज्य सरकारने अवलंबलेल्या वचनबद्धतेबाबत मनःपूर्वक कौतुक केले. सर्वसमावेशकता आणि विकासात्मक धोरणास आपला नेहमीच पाठिंब असल्याचे व्यक्त करत त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा २०२४चे माहितीपत्रक माननीय केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना सादर करताना आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा  हा एक विविधतेचा आणि समावेशकतेचा सोहळा आहेच त्याचबरोबर सामाजिक बदल घडवत जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये अधिक समावेशकता आणण्याचे आवाहन देखील आहे. या महोत्सवाचा उद्देश हा समाजामध्ये व्यापक प्रबोधन करणे, दिव्यांगजनांप्रती आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करणे हा आहे.”

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट- गोवा २०२४चे उद्दिष्ट दिव्यांगजनांसाठी त्यांची सर्जनशीलता, प्रतिभा आणि कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हे आहे. विविध कला प्रकार, प्रदर्शन आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून अडथळे दूर करणे, चुकीच्या रूढींना आव्हान देणे आणि सामाजिक समज वाढवत दिव्यांगजनांप्रती सामाजिक स्वीकृती वाढवणे ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न या महोत्सवातून होणार आहे. सक्षमीकरणाची भावना वाढवणे, प्रवेशसुलभतेला प्रोत्साहन देणे आणि दिव्यांगजनाचे हक्क आणि कल्याण साधणाऱ्या विचारांना व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हे उद्देशही या उपक्रमामागे आहेत.

#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 28 ऑक्टोबर 2023 चे वेळापत्रक