गोवा खबर:केंद्रिय निवणूक आयोगाच्या कार्यक्रमा प्रमाणे १ जानेवारी २०२४ ही पात्र तारीख ठरवून मतदार यादी विशेष उजळणी मोहिमेव्दारे गोवा राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघा संबंधित तयार केलेला मतदार यादीचा एकत्रित मसुदा २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिध्द केला आहे. मतदार यादी संबंधीचे दावे आणि आक्षेप २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत स्वीकारले जातील. विशेष मोहिमेची तारीख ४, ५, २५ आणि २६ नोव्हेंबर २०२३ रोजी नियोजित करण्यात येईल. २६ डिसेंबर २०२३ रोजी दावे निकालात काढण्यात येईल आणि ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादीचे प्रसिध्द करण्यात येईल.

राजकीय पक्ष आणि लोकांसाठी मतदार यादीचा मसुदा संबंधित लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र, संबंधित निर्वाचन अधिकारी आणि मामलेदार/संयुक्त मामलेदार/सहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कचेरीत उपलब्ध आहे. मतदारांनी मतदार यादीची तपासणी करून आपले नांव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी तसेच १ जानेवारी २०२४ रोजी वयाची १८वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे.

निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कचेरीच्यावतीने बुथ पातळीवर अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती केली आहे. तसेच हेल्पलाईन मोबाईल एप आणि https//voters.ecigov.in/ ऑनलाईन ई-सेवा उपलब्ध आहे. मतदारांनी दुरूस्ती, नवीन नोंदणी आणि मतदार ओळखपत्रात बदल करून घेण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा.

#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 28 ऑक्टोबर 2023 चे वेळापत्रक
मतदार यादीसंबंधी दावे आणि आक्षेप असल्यास www.ceogoa.nic.in या वेबसाईटवरून ९ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्य निर्वाचन अधिकाऱ्याच्या कचेरीत पाठवावे.