Connect with us

गोवा खबर

शारिरीक शिक्षकांसाठी बाल संरक्षण आणि पोक्सोचे प्रशिक्षण

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने ९ ऑक्टोबर २०२३ रोजी ७८ शारीरिक शिक्षकांसाठी बाल संरक्षण आणि पोक्सो कायद्यावर मिनेझीस ब्रागांझा संस्थेत पूर्ण दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले होते.

      क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याच्या उपसंचालक जेनिफर फेर्रांव यांच्याहस्ते गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर एफ. बोर्जेस यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.

      उपसंचालक श्रीमती. जेनिफर फेराव यांनी आयोगाचे कौतुक केले आणि प्रशिक्षणामुळे शिक्षकांना पोक्सो कायद्यासंबंधित माहिती होण्यास मदत होईल असे सांगितले. प्रत्येक विद्यार्थी आपल्या मुलाइतकाच लाडका आहे आणि शिक्षक या नात्याने आपण नेहमीच त्यांच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्यासाठी आणि अत्याचारापासून त्यांचे संरक्षण केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.