Connect with us

गोवा खबर

गोवा टीएमसीवर विश्वास ठेवा:डेरेक ओब्रायन

Published

on

Spread the love
 गोवा खबर:राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींनंतर, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन, गोवा तृणमूल काँग्रेसचे राज्य संयुक्त संयोजक समिल वळवईकर आणि मारियानो रॉड्रिग्स, सरचिटणीस अविता बांदोडकर आणि मीडिया समन्वयक ट्राजानो डीमेलो यांनी गोवा तृणमूल काँग्रेसच्या गोव्यातील जनतेची सेवा करण्याबाबत वचनबद्धतेची पणजी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  पुष्टी केली.
गोव्यातील लोकांना टीएमसीच्या वचनबद्धतेची आठवण करून देताना, ओब्रायन म्हणाले, “गेल्या वर्षी सप्टेंबर २०२१मध्ये आम्ही टीएमसीवर विश्वास ठेवा असे म्हटले होते; एक वर्षानंतर आम्ही एवढेच म्हणतो: टीएमसीवर विश्वास ठेवा. आम्ही पुढील अनेक वर्षे गोव्याची सेवा करण्यासाठी येथे आहोत. आमच्या विश्वासार्हतेमुळेच आम्ही आज तेच वचन देऊ शकतो.’’
सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे इशारा करताना, जिथे काँग्रेस आपला गट एकत्र ठेवण्यात अपयशी ठरली आहे, ओ’ ब्रायन म्हणाले, ‘निवडणुकीपूर्वी आमच्या उमेदवारांनी असे ठामपणे सांगितले की गोवा टीएमसीला दिलेले मत हे नेहमीच गोवा टीएमसीला मत असेल, हे काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या विपरीत असून स्वार्थासाठी गोव्यातील जनतेला मुर्ख बनवणारे ते एकत्र आले आहेत”
गोव्यातील लोकांप्रती पक्षाच्या विचारांवर भर देत त्यांनी विनंती केली की, ‘आम्ही तळागाळापासून पक्ष संघटना किती अथकपणे बांधत आहोत यावर बारीक लक्ष ठेवून गोवा टीएमसीवर विश्वास ठेवा.’ गोवा तृणमूल काँग्रेसच्या पहिल्या राज्य समितीच्या बैठकीत सारांश देताना ओब्रायन म्हणाले, ‘बैठकीचे अध्यक्षस्थान गोवा टीएमसीच्या नेत्यांनी केले होते, ज्यांनी संघटना बांधणीची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.’
पक्षाच्या भूमिकेची रूपरेषा सांगताना डेरेक ओ ब्रायन यांनी ‘एआयटीसी’च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना उद्धृत केले आणि ते म्हणाले, ‘धर्म हा खाजगी आहे आणि सण सर्वांसाठी आहेत.’
गोव्यातील लोकांसाठी गोवा तृणमूल काँग्रेसच्या वचनबद्धतेची ग्वाही देत, गोवा तृणमूल काँग्रेसचे संयुक्त संयोजक समिल वळवईकर, मारियानो रॉड्रिग्स आणि सरचिटणीस अविता बांदोडकर यांनी पक्षाच्या तीन आश्वासने अधोरेखित  करताना म्हटले, ‘आम्ही गोव्यातील लोकांसाठी काम करण्यासाठी आणि आमच्या योजना- गृहलक्ष्मी योजना, युवा शक्ती कार्ड आणि प्रत्येक गोमंतकियालाजमिनीचे  शीर्षक आणि मालकी हक्क पोहोचवण्याची खात्री देण्यासाठी येथे आलो आहोत.’