Connect with us

गोवा खबर

तिरंगा झेंड्याचाही भाजपकडुन धंदा : कॅप्टन विरीएटो फर्नांडिस

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीच सरकारने मागविलेले राष्ट्रध्वज खराब झाल्याचे सांगणे  अत्यंत दुर्देवी आहे. आपल्या राष्ट्रीय अभिमानाच्या प्रतिकांप्रती भाजप सरकारचे अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तन  यातुन दर्शवते. तिरंगा झेंडा गी आता भाजपचा धंदा झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते कॅप्टन विरीएटो फर्नांडिस यांनी केला आहे.
गोवा सरकारला मिळालेल्या सुमारे अडीच लाख भारतीय राष्ट्रध्वजांचे नुकसान झाल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कबुलीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना कॅप्टन विरिएटो फर्नांडिस यांनी भाजप सरकारला “डॅमेजींग सरकार म्हणून फटकारले आहे.
या सरकारला खाद्यपदार्थ, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांची किंमत कळत नाही. भाजपला राष्ट्रीय महत्वाच्या दिवासांचे उत्सव साजरे करुन माया जमविण्याचे वेड लागले आहे. यातुन त्यांनी  स्वातंत्र्यदिनालाही सोडलेला नाही, असे विरीएटो फर्नांडिस यांनी नमूद केले.
तिरंगा ध्वज खरेदीवर झालेल्या खर्चाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. बाजारभावाच्या तुलनेत झेंडे अत्यंत दुप्पट  दराने खरेदी केल्याची चर्चा लोकांमध्ये आहे, असा दावा कॅप्टन विरीएटो फर्नांडिस यांनी केला. खराब झालेल्या तिरंगा झेंड्याना जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे फोटो प्रदर्शित करणाऱ्या भाजपच्या तथाकथित “हर घर तिरंगा” मोहिमेच्या प्रचारासाठी इव्हेंट मॅनेजमेंट आणि जाहिरात एजन्सीच्या नियुक्तीवर झालेला खर्च आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.
राष्ट्रीय महामार्गावर लावलेल्या होर्डिंगसना कायदेशीर परवानगी आहे की नाही याचे सरकारने स्पष्टिकरण देणे गरजेचे आहे. भाजप सरकार प्रसिद्धीसाठी आणि एजन्सीकडून कमिशन घेऊन पैसा कमवण्यासाठी सर्व बेकायदेशीर मार्ग वापरत आहे का असा सवाल कॅप्टन विरीएटो फर्नांडिस यांनी केला आहे.
बेकायदेशीर होर्डिंग्जवर तिरंगा प्रदर्शित करणे हा आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे . जिल्हाधिकार्‍यांनी याची दखल घेऊन सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी कॅप्टन विरीएटो फर्नांडिस यांनी केली आहे.