Connect with us

गोवा खबर

राष्ट्रपती निवडणूक मतदान साहित्य गोव्यात ; १८ जुलै रोजी निवडणुका

Published

on

Spread the love

गोवा खबर: भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतपेटी आणि इतर मतदान साहित्य संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी नोडल अधिकारी श्रीमती आयशा वायंगणकर आणि गोवा राज्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री हरक्यूलिस नोरोन्हा यांनी गोव्यात आणले आणि गोवा विधानसभा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे.

भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे.

देशातील सर्वोच्च निर्वाचन पद असलेल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाची निवडणूक मुक्त आणि निष्पक्षपणे व्हावी यासाठी आयोगाने आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने  १८. जुलै २०२२ रोजीच्या नियोजित राष्ट्रपती निवडणूक आयोजनासाठी राज्य विधानसभेच्या सचिवालयांसह राजधानी दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीसाठी मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्य वितरित केले. मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त श्री अनूप चंद्र पांडे यांच्या देखरेखीखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक साहित्य वितरीत केले.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ५४ नुसार, राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे केली जाते ज्यात खालील गोष्टींचा समावेश होतो: (I) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य आणि सर्व राज्यांच्या विधानसभेवर निवडून आलेले सदस्य आणि केंद्रशासित प्रदेश विधानसभेवर निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे.

 मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार यांनी निवडणूक मुक्त वातावरणात आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कार्यपद्दतीचे कडक पालन करणे, मतदानाअगोदर आणि मतदानानंतर निवडणूकीचे सामान सुरक्षित खोलीत ठेवणे आणि इतर शिष्टाचार आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन याबाबतीत निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

निवडणूक मुक्त आणि निष्पक्षपणे घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरिक्षक मतपेटया आणि निवडणूक सामानाची सुरक्षा आणि वाहतुकीसाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतील. तसेच संसद सभागृहात नियुक्त केलेले निरीक्षक २१ जुलै २०२२ रोजी मतमोजणी प्रक्रियेवरही देखरेख करतील.