Connect with us

गोवा खबर

“गोवा ब्रदरहुड ऑफ मॅजिशियन्सतर्फे मडगावात मेंटॅलिझम कार्यशाळा”

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा ब्रदरहुड ऑफ मॅजिशियन्सतर्फे मडगाव येथील मंथन सभागृहात मेंटॅलिझम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, संपादक व साल टीव्हीचे मालक तसेच सम्राट क्लब नावेलिचे माजी अध्यक्ष आदित्य बिद्रे यांनी दीपप्रज्वलन केले.

जादू शब्दाचे व जादू कलेचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, सचिन तेंडुलकरच्या बॅटमध्ये जादू आहे, तर लता मंगेशकर यांच्या आवाजातही जादू होती. लहान मुले, मोठे व सर्व वयोगटातील लोक जादू या शब्दाने आकर्षित होतात व थक्क होतात. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी जादू घडतेच, असेही ते म्हणाले.

प्रसिद्ध मुंबईचे जादूगार व मेंटॅलिस्ट अरुण मांडे यांनी मेंटॅलिझमची कला शिकवली व त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जादूगार अप्सर शेख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रेमानंद पाटील, दुर्गादास नाईक व रामनारायण सिंह यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली, तर क्लिफर्ड पारख यांनी आभार मानले.