Connect with us

गोवा खबर

गोव्यात पुन्हा पावसाचा जोर; आज यलो अलर्ट, पुढील सहा दिवस अनेक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, आज (17 जुलै) उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. घाटमाथा आणि पूर्वेकडील भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची, तर राज्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या 17 ते 23 जुलै या कालावधीतील ताज्या अंदाजानुसार, 18 ते 23 जुलैदरम्यान उत्तर आणि दक्षिण गोव्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात कोणताही रंगीत इशारा नसला, तरी पावसाची सक्रियता कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, गेल्या 24 तासांत सांगे येथे 133.5 मिमी आणि वाळपई येथे 122.1 मिमी पावसाची नोंद झाली असून, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

हायलाइट्स :

आज (17 जुलै) उत्तर व दक्षिण गोव्यासाठी यलो अलर्ट

घाटमाथा आणि पूर्वेकडील भागांत मुसळधार पावसाची शक्यता

18 ते 23 जुलैदरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस

नागरिकांनी सखल भाग, नदीकाठ आणि दरडप्रवण भागात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.