Connect with us

गोवा खबर

दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दलाई लामा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दलाई लामा यांचा शांतता आणि सलोख्याचा संदेश जगभरातील लोकांसाठी एक मोठी मार्गदर्शक शक्ती असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात आवर्जून नमूद केले.

या संदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. दलाई लामा यांचे नैतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य, तसेच जगाच्या कल्याणासाठीची त्यांची वचनबद्धता अत्यंत प्रशंसनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परमपूज्य दलाई लामा यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे, अशी सदिच्छाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी व्यक्त केली.