Connect with us

गोवा खबर

5 किलोवॅटपर्यंतच्या वीज ग्राहकांचा मंजूर भार आपोआप वाढणार; CEE स्टीफन यांची माहिती

Published

on

Spread the love

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्य विद्युत अभियंता (CEE) स्टीफन यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, आजच एक परिपत्रक जारी करण्यात येणार असून त्यानुसार कमी मंजूर वीजभार असलेल्या ग्राहकांचा Sanctioned Load आपोआप वाढविण्यात येणार आहे.

परिपत्रकानुसार, 5 किलोवॅटपेक्षा कमी मंजूर भार असलेल्या सर्व ग्राहकांचा भार थेट 5 किलोवॅटपर्यंत वाढविला जाईल. त्याचप्रमाणे, 6 किलोवॅटसारखा 5 ते 10 किलोवॅटदरम्यान मंजूर भार असलेल्या ग्राहकांचा भार संबंधित श्रेणीनुसार 10 किलोवॅटपर्यंत वाढविण्यात येईल.

मात्र, 10 किलोवॅटपेक्षा जास्त मंजूर भार आवश्यक असलेल्या ग्राहकांना स्वतंत्र अर्ज करावा लागेल. अशा ग्राहकांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्युत विभागाकडून तीन महिन्यांची मुदत दिली जाणार असल्याची माहिती CEE स्टीफन यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली असून, ग्राहकांना वीजभार नियमित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.