Connect with us

गोवा खबर

खेळता खेळता विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने वास्कोत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

Published

on

Spread the love

गोवा खबर : मांगोरहिल-वास्को येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराच्या पडवीत (शेड) खेळत असलेल्या अंकुश शिवकुमार यादव या तीन वर्षांच्या बालकाचा विजेच्या जिवंत तारेला नकळत स्पर्श झाला. या भीषण धक्क्यामुळे तो जमिनीवर कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने चिखली उपजिल्हा रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वास्को पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा उघड्या तारा ठेवल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी गंभीर निष्काळजीपणावर आक्षेप घेतला आहे.