Connect with us

गोवा खबर

योगदिनी दोन लाख लोकांचा सहभाग शक्य

Published

on

Spread the love

गोवा खबर : येत्या २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त गोव्यात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात राज्यभरातून सुमारे दोन लाख लोक सहभागी होण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

या दिवशी सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून रविवारची सुट्टी असली तरी सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यभरात एक हजार ठिकाणी सकाळी ६ वाजता योगासनांचे कार्यक्रम होतील आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचे प्रदर्शनही प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहे.