गोवा खबर : गोव्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी शिरोड्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विरोधकांना टोला लगावला आहे. निवडणुकीच्या काळात शिरोड्यात अळंब्यासारखी राजकीय कार्यालये सुरू होतात, असा अनुभव त्यांनी व्यक्त केला. मात्र, जोपर्यंत जनता आणि भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत खंबीरपणे उभे आहेत, तोपर्यंत अशा तात्पुरत्या कार्यालयांनी आपल्याला काहीच फरक पडत नाही, असा विश्वास त्यांनी दाखवला.
आगामी निवडणुकीतील युतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर न ठरता पक्षाचे हायकमांड घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.