गोवा खबर : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेऊन वीज दरांबाबत मागणी केली आहे. गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट वीज मोफत द्यावी आणि १५ जूनपर्यंतची जुनी थकबाकी माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारने या मागण्यांचा विचार करून जनतेला दिलासा देण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत द्यावी, अन्यथा पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच दिल्लीमध्ये ही योजना यशस्वीपणे सुरू असून गोव्यातही यामुळे सरकारवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले.