Connect with us

गोवा खबर

पावसाची ५० टक्के तूट; राज्य सरकार सतर्क

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात यंदा मान्सूनचा जोर ओसरल्याचे चित्र असून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार १४ जूनपर्यंत राज्यात चक्क ५० टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या दैनिक सरासरी पर्जन्यमान आलेखावरून १ जून ते १४ जून या कालावधीत अपेक्षित सामान्य पाऊस सुमारे १२.८ इंच इतका असताना प्रत्यक्षात केवळ ६.४ इंच पाऊस झाला आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चिंता व्यक्त केली असून संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलस्रोत खात्याला तातडीने कडक पाणी व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भूगर्भातील पाण्याचे साठे पुनरुज्जीवित करण्यासाठी कूपनलिका म्हणजेच बोअरवेल वापरकर्त्यांना जलसंधारण उपाययोजना करणे आता बंधनकारक असणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि विहिरी तसेच बोअरवेल रिचार्ज करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रशासन केवळ जनतेलाच आवाहन करत नसून सरकार स्वतः सर्व संभाव्य ठिकाणी जलसंधारणाचे विविध उपक्रम आणि प्रकल्प राबवणार आहे. जलस्रोत विभाग या कामाला लागला असून नागरिकांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पाणी साठवणे आणि त्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.