Connect with us

गोवा खबर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील ‘इनअॅक्टिव्ह’ पदाधिकारी रडारवर

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे काम न करता केवळ पदे अडवून बसलेल्या आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत अधिकृत उमेदवारांविरोधात निष्क्रीय राहिलेल्या ‘इनअॅक्टिव्ह’ पदाधिकाऱ्यांना बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हल्दोणे जिल्हा पंचायत मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष रणजित उसगावकर आणि मंडळ सरचिटणीस मनीषा नाईक यांना पदावरून हटवण्यात आले असून, इतर ठिकाणीही असे बदल होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले की, ही कोणतीही दंडात्मक कारवाई नसून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पदाला न्याय देणाऱ्या योग्य व्यक्तींना जबाबदारी देण्यासाठी केलेले हे अंतर्गत बदल आहेत.