गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील खोतोडे येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सभेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची ग्वाही दिली. केंद्र व गोवा सरकारच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
महिला आणि युवकांच्या सबलीकरणावर विशेष भर दिला जात असून, महिलांमध्ये वाढणारा कर्करोगाचा धोका लक्षात घेता फुफ्फुस आणि स्तनांच्या कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी विशेष स्क्रीनिंग मोहीम राबवली जात आहे. खोतोडे-सत्तरी परिसरातील रस्त्यांचे जाळे विणणे, पाणीपुरवठा सुधारणे आणि एसीजीएलच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे या विकासकामांचा आढावा घेत त्यांनी आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.