Connect with us

गोवा खबर

राज्यात पेट्रोलची टंचाई नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका

Published

on

Spread the love

गोवा पेट्रोल डीलर असोसिएशनचे स्पष्टीकरण; दरही स्थिर

गोवा खबर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पेट्रोल टंचाईच्या वावड्या उठल्या आहेत. मात्र, गोव्यामध्ये इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे ‘गोवा पेट्रोल डीलर असोसिएशन’चे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

  • पुरवठा सुरळीत: राज्यात दर आठवड्याला पेट्रोलचे टँकर आणि जहाजे येत असून सुमारे १५ दिवसांचा साठा सध्या उपलब्ध आहे.
  • अनावश्यक गर्दी टाळा: अफवांमुळे नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करत असून काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडत आहेत. ग्राहकांनी पंपावर गोंधळ घालू नये, असे आवाहन संघटनेने केले आहे.
  • शेजारील देशांशी तुलना: नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये इंधनाचे दर प्रचंड वाढले असताना भारतात मात्र पेट्रोलचे दर तुलनेने स्थिर आहेत.