Connect with us

गोवा खबर

‘विश्वजित राणे चषक’ क्रिकेट स्पर्धेत ‘मॅच फिक्सिंग कारापूर’ विजेता; उसगावात लवकरच क्रीडा प्रकल्पाचे लोकार्पण

Published

on

Spread the love

गोवा खबर : टाकवाडा-उसगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ‘विश्वजित राणे चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद ‘मॅच फिक्सिंग कारापूर’ संघाने पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी ‘दत्ता क्लासेस अस्नोडा’ या संघाचा पराभव केला.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार:

  • मालिकावीर: सिद्धेश मेणकुरकर (मॅच फिक्सिंग कारापूर)
  • उत्कृष्ट गोलंदाज: रुद्रेश गावकर (मॅच फिक्सिंग कारापूर)
  • उत्कृष्ट फलंदाज: पूनाजी कलंगुटकर (दत्ता क्लासेस अस्नोडा)
  • सामनावीर (अंतिम सामना): लतिक नाईक (मॅच फिक्सिंग कारापूर)
  • विशेष पारितोषिक: ओमकार गावकर (गांजेश्वरी क्रीडा मंडळ, गांजे)

बक्षीस वितरण समारंभात बोलताना मंत्री विश्वजित राणे यांनी उसगावातील क्रीडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लवकरच लोकार्पण होईल, अशी घोषणा केली. तसेच, उसगावात अजून एक क्रीडांगण उभारण्यासाठी कमुनिदादकडे जागा मागितल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उसगाव पंचायत, सत्तरीतील पंचायतींचे प्रतिनिधी आणि वाळपई नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.