Connect with us

गोवा खबर

“हा तर लोकशाहीचा खून!” – पोटनिवडणूक रद्द झाल्यावरून केतन भाटीकर यांचा सरकारवर प्रहार

Published

on

Spread the love

गोवा खबर : फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. “हा लोकशाहीचा खून आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

पराभवाच्या भीतीने सरकार पळाले? डॉ. भाटीकर म्हणाले की, “गेल्या १५ दिवसांपासून आमचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करत होते. जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने असल्याचे पाहून भाजप सरकार घाबरले होते. आपला पराभव निश्चित आहे हे ओळखूनच सरकार आणि निवडणूक आयोगाने संगनमताने ही निवडणूक रद्द करण्याची खेळी खेळली आहे. जर निवडणूक घ्यायची नव्हती, तर मग इतके दिवस प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेचा पैसा का खर्च केला?”

आश्वासनांची आठवण: यावेळी भाटीकर यांनी भाजपला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली. “निवडणूक असली किंवा नसली, तरी फोंडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे आणि फोंड्यात साडेआठ हजार युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावे,” अशी मागणी त्यांनी केली.

भाजपची प्रतिक्रिया: दुसरीकडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निकाल ‘धक्कादायक’ असल्याचे म्हटले आहे. भाजप उमेदवार रितेश नाईक हे ४००० मतांच्या फरकाने निवडून आले असते, असा दावा करत त्यांनी न्यायालयाच्या निकालाचा आदर करत असल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेसने या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे संकेत दिले आहेत.