Connect with us

गोवा खबर

भाजप महिला मोर्चाची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर

Published

on

Spread the love
  • अध्यक्षपदी सुवर्णा प्रभू तेंडुलकर, तर सरचिटणीसपदी विद्या गावडे व उषा नागवेकर यांची निवड

 

गोवा खबर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सुवर्णा प्रभू तेंडुलकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेंडुलकर या भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या असून त्यांनी यापूर्वी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या मान्यतेनंतर राज्य सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी या समितीची अधिकृत घोषणा केली. नवीन कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून विद्या गावडे आणि उषा नागवेकर यांची निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी दीक्षा माईणकर, दिओना कोरगावकर, जॉर्जिना गामा आणि नर्मदा कुंडईकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

आगामी काळात महिला मोर्चा बूथ पातळीपर्यंत संघटन विस्तार, महिला सदस्य नोंदणी मोहीम आणि विविध सेवा प्रकल्प राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नारी शक्ती’ संकल्पनेनुसार महिलांचा राजकीय आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी ही समिती कटिबद्ध असेल, असे यावेळी नमूद करण्यात आले.

Continue Reading