Connect with us

गोवा खबर

बाबूश पॅनेलचे सर्व ३० अर्ज दाखल

Published

on

Spread the love
  • ‘टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी’ला विजयाचा विश्वास; उदय मडकईकरांचा पाठिंबा

 

गोवा खबर : पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी महसूल मंत्री बाबूश मोन्सरेत यांच्या समर्थित ‘टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी’ या पॅनेलच्या सर्व ३० उमेदवारांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महापौर रोहित मोन्सरेत यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी प्रथम महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मिरवणुकीने जात मामलेदार कार्यालयात अर्ज सादर केले.

यावेळी माजी महापौर उदय मडकईकर यांनी मोन्सरेत पॅनेलला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की, रोहित मोन्सरेत यांनी महापौर म्हणून उत्तम काम केले आहे आणि स्मार्ट सिटीची कामे आता पूर्णत्वाकडे आहेत, ज्यामुळे नागरिक समाधानी आहेत. दरम्यान, विरोधकांनी उभ्या केलेल्या ‘आम्ही पणजीकर’ पॅनेलवर भाष्य करताना महापौर रोहित मोन्सरेत यांनी त्यांना शुभेच्छा देत “लोकशाहीत मतदारच अंतिम निर्णय घेतील” असे सांगितले.

कॅसिनोच्या मुद्द्यावर बोलताना मडकईकर यांनी स्पष्ट केले की, कॅसिनो हटवणे हे महापालिकेच्या अखत्यारीत नसून तो राज्य सरकारचा विषय आहे.