गोवा खबर : वीज खात्याने राज्यभरात ७.५ लाख स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, हे काम ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी नुकत्याच झालेल्या जनसुनावणीत ही माहिती दिली.
या प्रकल्पासाठी सुमारे ८९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची रिअल-टाइम माहिती मिळणार असून, यामुळे बिलिंगमधील चुका कमी होतील. हे मीटर ‘प्रीपेड’ पद्धतीवर आधारित असतील, म्हणजेच ग्राहकांना मोबाईलप्रमाणे आधी रिचार्ज करावे लागेल. जरी काही भागातून याला विरोध होत असला, तरी वीज खात्याने स्पष्ट केले आहे की, यामुळे पारदर्शकता वाढेल आणि वीज चोरीला आळा बसेल.