Connect with us

गोवा खबर

राज्यातील सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार : आमोणकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील प्रस्तावित सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम पुढील तीन महिन्यांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती मलनिःसारण महामंडळाचे नवे अध्यक्ष आणि आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली. त्यांनी बुधवारी पणजी येथील कार्यालयात अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

आमोणकर म्हणाले, पर्वरी, रायबंदर, कुडचडे आणि इतर तीन ठिकाणी हे प्रकल्प येऊ घातले आहेत. पुढील तीन महिन्यांत या सर्व प्रकल्पांची सुरुवात केली जाईल.

त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे पेलणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

आमोणकर म्हणाले, सध्या राज्यातील अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या ३५ ते ४० वर्ष जुन्या वाहिन्या आहेत. त्या वारंवार फुटतात आणि गळती होते. त्यामुळे जुन्या वाहिन्या बदलण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच नागरिकांनी अधिकाधिक सांडपाणी जोडण्या घ्याव्यात, असेही त्यांनी आवाहन केले.