Connect with us

गोवा खबर

 ‘माझे घर’ला विरोधकांची आडकाठी : गरीब महिलेला फूस लावून याचिका दाखल केल्याचा आरोप

Published

on

Spread the love

गोवा खबर : विरोधकांनी एका गरीब महिलेला फूस लावून योजनेविरोधात याचिका दाखल केली. पण आम्ही एकही घर जमीनदोस्त होऊ देणार नाही, असा आरोप आणि इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रे येथे दिला.

कार्यक्रमात खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारने प्रत्येक धर्मीय व घटकांसाठी ही योजना आणली आहे. ३ दिवसांत अर्ज मंजूर होऊन परवाना मिळेल. सनद मिळाल्यानंतर लोकांना बँक कर्जाची सुविधाही मिळेल.