गोवा खबर : ‘माझे घर’ योजनेला कोण विरोध करतो, हे जनतेने लक्षात ठेवावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना आवाहन केले.
काणकोण रवींद्र भवन येथे आयोजित अर्ज वितरण कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले, भाजप सरकार हे सर्वसामान्य जनतेचे आहे. कुणाचेही घर मोडण्याचा आमचा हेतू नाही.
कार्यक्रमास मंत्री रमेश तवडकर, नगराध्यक्ष लक्ष्मण पागी, जिल्हाधिकारी एग्ना किल्टस आणि अनेक सरपंच उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी महिलांना ‘माझे घर’ योजनेअंतर्गत अर्जांचे वितरण केले.
मंत्री रमेश तवडकर म्हणाले, या योजनेमुळे कोमुनिदाद जमिनीवरील घरांना संरक्षण मिळणार आहे. ही योजना अनेकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले.