Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्यिक विश्वास पाटील यांचा सत्कार

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि पणजीतर्फे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम सचिवालय विधानसभा संकुलात पार पडला. यावेळी डॉ. सावंत यांनी पाटील यांचे अभिनंदन करून साहित्य संमेलन यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या.

विश्वास पाटील यांनी आपल्या पुस्तकांचा संच मुख्यमंत्र्यांना प्रदान केला. या प्रसंगी गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, इन्स्टिट्यूट ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.