Connect with us

गोवा खबर

पहिल्यांदाच आयोजित सीएसआर-एनजीओ संमेलनाला उत्साहवर्धक प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक उपक्रम म्हणून विद्या भारती गोवा यांच्या पुढाकाराने, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि साई इन्स्टिट्यूट (मोर्ले) यांच्या सहकार्याने पहिल्यांदाच सीएसआर-एनजीओ संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाचा उद्देश उद्योगक्षेत्र आणि सामाजिक संस्थांमधील अर्थपूर्ण भागीदारी घडवून आणणे आणि समाजविकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे हा होता.

या उपक्रमात गोवा शिपयार्ड, परादीप फॉस्फेट्स, युनिकेम, फायनलेक्स, नेस्ले, मिनरल फाउंडेशन, जेनो, एमआरएफ यांसारख्या प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. विविध स्वयंसेवी संस्थांनी आपल्या सीएसआर प्रकल्पांचे सादरीकरण कॉर्पोरेट प्रतिनिधींसमोर केले, ज्यास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जीसीसीआयचे संचालक किरण बाळ्ळीकर यांनी स्वागत केले, तर प्रमुख अतिथी डॉ. प्रमोद साळगांवकर म्हणाल्या, शिक्षण हेच खरे सक्षमीकरणाचे साधन आहे. सीएसआरपूर्वीपासूनच आम्ही समाजकार्यात सक्रिय आहोत.

विद्या भारतीचे अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगांवकर यांनी सांगितले की, हे संमेलन म्हणजे जणू ‘मॅचमेकींग मिट’ आहे, जिथे कॉर्पोरेट्स आणि एनजीओ एकत्र येऊन दीर्घकालीन सहकार्याची वाट मोकळी करत आहेत.

कार्यक्रमाचा समारोप डॉ. शेख मोहम्मद परवेज अल उस्मानी यांच्या भाषणाने झाला. सूत्रसंचालन अॅड. रोशन सामंत आणि प्रा. आत्माराम गावकर यांनी केले, तर आभार प्रा. शशांक कामत यांनी मानले.

दरम्यान, ‘सीएसआर प्रस्ताव तयार करताना येणाऱ्या अडचणी’ या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. विशाल सिगनापुरकर यांनी सूत्रसंचालन केले तर तेजा गडेकर (जेनो), प्रशांत गुंजीकर (गोवा शिपयार्ड), डी. व्ही. तेंडुलकर (परादीप फॉस्फेट्स) आणि संदीप हाल्याळी यांनी सहभाग घेतला.