Connect with us

गोवा खबर

पर्येतील सरकारी प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीला प्रारंभ

Published

on

Spread the love
  • आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या उपस्थितीत कामांची सुरुवात

गोवा खबर : पर्ये येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण दुरुस्ती कामांचा शुभारंभ पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कामांमुळे शाळेचे संपूर्ण रूपांतर होऊन विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण तयार होणार असल्याचा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.

या कामांतर्गत जुन्या कौल छपराऐवजी डबल कोट स्किन रूफिंग शीट्स बसविण्यात येणार आहेत. तसेच नवीन शौचालय इमारत उभारली जाईल, अॅल्युमिनियम स्लायडिंग खिडक्या-दरवाजे बसवले जातील. वर्गखोल्यांमध्ये नवीन फरशी, टाइल्स, आतील व बाहेरील रंगकाम, फॉल्स सिलिंग आणि सुरक्षिततेसाठी लोखंडी ग्रील्स बसविण्यात येणार आहेत.

शाळेच्या मुख्य दरवाजापासून इमारतीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी पादचारी मार्ग (फूटपाथ) तयार केला जाईल. या सर्व कामांमुळे शाळेच्या सौंदर्यात आणि कार्यक्षमतेत भर पडेल, असे आमदारांनी सांगितले.

आमदार राणे म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रात केलेली गुंतवणूक म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक आहे. आगामी काही महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण होऊन शाळा नव्या रूपात विद्यार्थ्यांसाठी सज्ज होईल.

कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.