-
‘माझे घर योजना’ अर्ज वितरण कार्यक्रम नास्नोडा पंचायतीत
गोवा खबर : लोकांच्या हितासाठी झटणारे सरकार म्हणजेच भाजप सरकार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नास्नोडा पंचायतीत आयोजित ‘माझे घर योजना’ अर्ज वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार अॅड. कार्ल्स फरेरा, माजी आमदार ग्लेन टिकलो व अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना या योजनेची माहिती देत सांगितले की, या योजनेमुळे राज्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘माझे घर योजना’ ही राज्यातील नागरिकांना सुख-शांती देणारी योजना असल्याचे सांगून सरकारचे अभिनंदन केले.
आमदार कार्ल्स फरेरा यांनी यावेळी केबल स्टेड पुलाच्या दुरुस्तीसह मार्केट प्रकल्प लवकर मार्गी लावावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.