Connect with us

गोवा खबर

शिल्पकलेत गोवा स्वयंपूर्ण होणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा राज्यात पारंपरिक आणि हस्तकला शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत आहे. “राज्यातील कारागीर स्वावलंबी व्हावेत आणि गोवा शिल्पकलेत स्वयंपूर्ण व्हावा,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वस्त्रोद्योग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमीत आयोजित ‘गांधी शिल्प बाजार’ या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उद्योग मंत्री माविन गुदिन्हो, आमदार अॅन्थनी वाझ, तसेच विविध अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेमुळे ग्रामउद्योगाला मोठे व्यासपीठ मिळाले आहे. आज देशभरात हस्तकलेच्या वस्तूंना चांगले मार्केट मिळत असून गोवा त्यात सक्रिय सहभागी होत आहे.”

उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, “या शिल्प बाजाराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि पारंपरिक कलेचे संवर्धन करणे.”

या प्रदर्शनात देशभरातील शिल्पकार व हस्तकला उत्पादक सहभागी झाले आहेत. गांधी जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला असून, स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर शिल्पकला आणि हस्तकलेला प्रोत्साहन देणे हा मुख्य हेतू आहे.

कार्यक्रमादरम्यान पारंपरिक कलाकृतींचे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.