Connect with us

गोवा खबर

गोवा केंद्रीय संचार ब्युरोचा ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘राष्ट्रीय पोषण माह’ संदर्भात जागरूकता कार्यक्रम 

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गोवा येथील केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी) ने आज, 30 सप्टेंबर रोजी उत्तर गोवा येथील चिंचोली, तिसवडी मधील पीएम श्री सरकारी प्राथमिक शाळा येथे ‘स्वच्छता ही सेवा’ आणि 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ संदर्भात जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाची सुरुवात पोषण या विषयावरील संवादात्मक साप – शिडीच्या खेळाने झाली.विद्यार्थ्यांना रंजकतेने माहिती  देण्यासाठी आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा खेळ तयार करण्यात आला  होता. त्यानंतर “एक पेड माँ के नाम” मोहिमेअंतर्गत फळझाडांची रोपे लावण्यात आली. ही मोहीम पर्यावरणीय शाश्वततेचा संदेश देते आणि निसर्गाची जोपासना  करण्याच्या भावनेचा सन्मान करते.

‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेचा एक भाग म्हणून, विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये स्वच्छतेचा प्रारंभ  स्वतःच्या परिसरापासून सुरू करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आणि स्वच्छतेच्या पद्धतींचा अवलंब करण्यास समुदायाला प्रेरित करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला.पोषण या संकल्पनेवर आधारित असलेल्या खेळातील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच पोषण आणि स्वच्छता संदेशाचा प्रसार  करत राहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

या कार्यक्रमात सीबीसी गोवा येथील प्रसिद्धी सहाय्यक शुभम गुडधे; चिंचोली येथील पीएम श्री सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वीटी एस. मांद्रेकर, शिक्षक आणि इतर सीबीसी अधिकारी उपस्थित होते.