Connect with us

गोवा खबर

अहवालानंतर खड्डेमुक्त रस्त्यांचे काम सुरू : कामत

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील रस्त्यांची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी बायणा येथील विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली.

ते म्हणाले, सर्व रस्त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर लगेचच दुरुस्तीची कामे सुरू केली जातील. पावसामुळे पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत, मात्र डांबरीकरण करून हे रस्ते खड्डेमुक्त केले जातील.

यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगरसेवक दीपक नाईक आदी उपस्थित होते. साळकर यांनी वास्कोत भूमिगत वीजवाहिन्या टाकल्यानंतर खराब झालेल्या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली. मंत्री कामत यांनी पाऊस थांबताच ‘हॉटमिक्सिंग प्लांट’ सुरू करून डांबरीकरणाचे काम करण्याचे आश्वासन दिले.