Connect with us

गोवा खबर

गोव्यात केराटोकोनस उपचारांमध्ये एएसजी आय हॉस्पिटल अग्रणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : केराटोकोनस या नेत्रविकारामध्ये नेत्रपटल पातळ व फुगीर बनते. रुग्ण आणि नेत्ररोगतज्ज्ञ या दोन्ही घटकांसाठी ही समस्या एक मोठे आव्हान ठरत आली आहे. ही स्थिती, बहुतेकदा पौगंडावस्थेत किंवा प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या काळात सुरू होते, आणि वेळेत उपचार न केल्यास लक्षणीय दृष्टिदोष निर्माण करू शकते. वर्षानुवर्षे, केराटोकोनसवर उपचारपर्यायांमध्ये चष्मा वापरणे, कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे किंवा नेत्रपटलाचे प्रत्यारोपण असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. तथापि, आता आधुनिक नेत्ररोगशास्त्राने कॉर्नियल कोलेजन क्रॉस-लिंकिंग (C3R किंवा CXL) या क्रांतिकारी उपचार पद्धतीचा विकास केला असून, यामुळे या नेत्रसमस्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे.

कॉर्नियल कोलेजन क्रॉस-लिंकिंग (C3R/CXL) ने केराटोकोनस रुग्णांचा दृष्टिकोन देखील बदलला आहे. या सोप्या, कमीत कमी छेद घ्यावा लागण्याची गरज असलेल्या शस्त्रक्रियेमध्ये रिबोफ्लेविनचे थेंब आणि अल्ट्राव्हायोलेट प्रकाश यांचा एकत्रित वापर करत नेत्रपटलाला बळ दिले जाते आणि या समस्येची तीव्रता वाढण्यास मज्जाव केला जातो. नेत्रपटल स्थिर करून, ते नैसर्गिक दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते आणि बहुतांशदा प्रत्यारोपणाची गरज दूर होते किंवा कमी होते. रुग्णाच्या नैसर्गिक नेत्रपटलाची जतन करण्याची क्षमता आणि अनेक प्रकरणांमध्ये नेत्रपटल प्रत्यारोपणाची आवश्यकता विलंबित होते किंवा अगदी दूर करता येते यामुळे ही उपचार पद्धती विशेष महत्त्वपूर्ण ठरत आहे. केराटोकोनसचे निदान झालेल्या तरुण रुग्णासाठी, भविष्य अनेकदा अनिश्चित वाटू शकते. अंधुक किंवा विकृत दृष्टी, चष्म्याच्या क्रमांकामध्ये वारंवार बदल करण्याची गरज आणि कॉन्टॅक्ट लेन्स घालण्यात अडचण अशा समस्यांना या रुग्णांना सतत सामोरे जावे लागत असे. C3R ही उपचारपद्धती समस्येच्या प्राथमिक टप्प्यातच हस्तक्षेप करू शकत असल्याने आशेचा किरण प्रदान करते. कॉर्निया स्थिर करून, रुग्णांना अनेक वर्षांसाठी दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते. जगभरातील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, C3R ही उपचार पद्धती रोगाची प्रगती थांबवतेच, त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये, नेत्रपटलाचा आकार आणि दृष्टी यामध्येही सुधारणा करते. जलद, तुलनेने वेदनारहित अशी ही उपचारपद्धती प्रशिक्षित तज्ञांद्वारे केल्यावर नेत्रसुरक्षेची खात्री वाढवते.

नेत्रोपचार सुविधा विकासातील या टप्प्याबाबत बोलताना, एएसजी आय हॉस्पिटल गोवाचे कन्सल्टंट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉ. चंद्रप्रकाश ओली म्हणाले, “केराटोकोनसवरील उपचारांमध्ये कॉर्नियल कोलेजन क्रॉस-लिंकिंग हे तंत्रज्ञान गेम-चेंजर ठरले आहे. या उपचार पद्धतीत नेत्रपटलाला बळकटी पुरविली जाते, तसेच समस्येची तीव्रता वाढण्यापासून रोखले जाते. तसेच क्रॉस-लिंकिंग (सीएक्सएल) तंत्रज्ञान रुग्णाच्या नेत्रपटलाचे रक्षण करण्याची आणि भविष्यात कॉर्नियल प्रत्यारोपणाची गरज टाळण्याची संधी देते. उपचारांची खात्री वाढविण्यासाठी लवकर निदान आणि वेळेवर उपचार करणे महत्वाचे ठरते.”

नेत्रसमस्यांवर उपचारांसाठी पूर्वी गोव्यातील रुग्णांना राज्याबाहेरील मोठ्या शहरांत जावे लागत असे. तथापि, एएसजी आय हॉस्पिटल गोवा सारख्या रुग्णालयांनी सी3आरसह विशेष कॉर्नियल सेवा सुरू केल्यामुळे, रुग्णांना आता अशा उपचारांसाठी राज्याबाहेर जाण्याची गरज राहिली नाही. राज्यामध्येच अशा उपचारांची सुविधा झाल्याने वेळेवर उपचार करणे, शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारसुविधा सुलभपणे करणे यांसह रुग्णांच्या कुटुंबावरील आर्थिक आणि मानसिक ओझे कमी झाले आहे.

जगभर केराटोकोनसची समस्या मोठी आहे. याबाबत लवकर निदान करून घेणे आवश्यक असते आणि याबाबत लोकांमध्ये जागरूकता घडविणे महत्त्वाचे आहे. अनेक रुग्ण, आपला आजार बळावल्यानंतरच उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतात. पण केराटोकोनसची समस्या पुढच्या टप्प्यात पोचल्यावर उपचारांचे पर्याय मर्यादित असतात. नियमित डोळ्यांची तपासणी करत राहणे, विशेषतः तरुणांसाठी दृष्टीमध्ये वारंवार बदल होत असल्यास महत्वाचे राहते. त्यामुळे या समस्येचे लवकर निदान होऊ शकते आणि वेळेवर C3R उपचार होऊ शकतात.

नेत्रदान पंधरवड्याचे औचित्य साधत, एएसजी नेत्र रुग्णालयाद्वारे जागृती उपक्रमांच्या माध्यमातून अंधांसाठी नेत्रपटल प्रत्यारोपणाचे महत्त्व आणि दृष्टी गमावण्यापूर्वी ती जपण्यासाठी C3R सारख्या प्रतिबंधात्मक उपचारांची भूमिका अधोरेखित केली जात आहे. कॉर्नियल क्रॉस-लिंकिंग सारख्या आधुनिक उपचारांच्या माध्यमातून गोवा राज्यात नेत्रसुरक्षा सुविधेबाबत एक नवे युग अवतरले असून यामुळे नेत्रसमस्या असलेल्या रुग्णांना एक नवी आशा, उमेद आणि उज्ज्वल भविष्याची शक्यता मिळाली आहे.

एएसजी आय हॉस्पिटल गोवाविषयी

देशभरामध्ये २००हून अधिक शाखांसह भारतातील आघाडीच्या सुपर-स्पेशालिटी नेत्र रुग्णालय साखळींपैकी एक असलेल्या एएसजी आय हॉस्पिटल्स नेटवर्कचा एएसजी आय हॉस्पिटल गोवा हे एक भाग आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जागतिक दर्जाची नेत्र सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापित एएसजी आय हॉस्पिटल्स मोतीबिंदू, रेटिना, कॉर्निया, काचबिंदू, बालरोग नेत्ररोग, रिफ्रॅक्टिव शस्त्रक्रिया आणि प्रगत केराटोकोनस व्यवस्थापन यासह व्यापक नेत्रोपचार सेवा देते.

एएसजी आय हॉस्पिटल गोवा येथे, रुग्णांना एकाच छताखाली अत्याधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित सर्जन आणि समग्र नेत्रोपचार सुविधा उपलब्ध आहेत. सुलभ, परवडणारी आणि संवेदनशील नेत्रोपचार सेवासुविधा उपलब्ध करण्याबरोबरच नेत्रदान आणि प्रतिबंधात्मक उपचारांबाबत जनजागृती घडविण्यासाठी हे हॉस्पिटल कटिबद्ध असून अग्रणी राहिले आहे.