Connect with us

गोवा खबर

गोव्यात १८व्या डिजिटल तंत्रज्ञान परिषदेचे (डीटीसी) आयोजन

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने गव्हकनेक्टने सुरू केलेल्या डिजिटल तंत्रज्ञान परिषदेच्या (डीटीसी) १८व्या आवृत्तीचे आज गोव्यात आयोजन करण्यात आले. भारताच्या डिजिटल प्रशासन प्रवासाच्या पुढील अध्यायाला आकार देण्यासाठी या मंचाने वरिष्ठ धोरणकर्ते, सरकारी नेते आणि उद्योग प्रणेत्यांना एकत्र आणले.
या परिषदेची सुरुवात करताना, *”डिजिटल इंडिया ते विकसित भारत – प्रशासन परिवर्तनासाठी एकीकृत दृष्टी”* या विषयावरील सत्रात डिजिटल प्रशासन, सायबर सुरक्षा, पुढील पिढीसाठी सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नागरिक सेवा मजबूत करण्यात उदयोन्मुख तंत्रज्ञानाची भूमिका याव चर्चा करण्यात आली.
गोवा सरकारचे पर्यटन, आयटी, ई अँड सी तथा प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री, रोहन खंवटे यांनी भारताच्या डिजिटल नकाशामध्ये गोव्यात विकसित होत असलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर मिझोराम सरकारचे माननीय मंत्री, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान खाते, शालेय शिक्षण खाते, उच्च आणि तंत्रशिक्षण खाते, माहिती आणि जनसंपर्क खाते आणि प्रिंटिंग आणि स्टेशनरी खाते  वनलालथलाना;* सीईओ आणि कार्यकारी संचालक, गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, रेवती कुमार तसेच अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योग नेते उपस्थित होते.
“आज, आम्ही डिजिटल इंडिया ते विकसित भारत या दिशेने वाटचाल करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाची पुष्टी करतो. एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे, गोवा राज्य प्रशासन सर्वसमावेशक, पारदर्शक बनवून लोकांच्या जवळ आणत आहे. आम्ही गोवा एआय मिशन २०२७शी सुसंगत असलेले एक स्मार्ट, भविष्यासाठी तयार असलेले राज्य घडवित आहोत, जिथे तंत्रज्ञान हे विकासाला चालना देईल आणि प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवेल. हे एक सामूहिक ध्येय आहे, जिथे एआय हे प्रशासनातील केवळ कार्यक्षमतेबद्दल नसून सर्जनशीलता, समावेशकता आणि परिवर्तनाबद्दल देखील आहे. सर्जनशीलता, मोकळेपणा आणि लवचिकतेच्या भावनेसह गोवा या बदलाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे,” असेही मंत्री खंवटे म्हणाले.
या परिषदेत एआय-चालित प्रशासन, सायबर लवचिकता, जनरेटिव्ह एआय आणि विघटनकारी तंत्रज्ञान तसेच नागरिक-केंद्रित सेवांसह प्रशासनाचे डिजिटल भविष्य, या विषयांवर अभ्यासपूर्ण पॅनेल चर्चा आणि सादरीकरणे झाली. प्रत्येक सत्रात प्रशासन, सार्वजनिक सेवा वितरण आणि आर्थिक लवचिकता मजबूत करण्यासाठी एआय, मशीन लर्निंग, क्लाउड आणि सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर करण्यावर कृतीशील अंतर्दृष्टी देण्यात आली.
या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून, गोव्याने भारताच्या डिजिटल विकासाच्या कथेत एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एक असे राज्य जे परिसंस्थेला बळकट करू शकते आणि लोकांना सहकार्य, गुंतवणूक आणि नवोपक्रमाच्या संधी प्रदान करू शकते.