Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या देशातील नागरिकांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहे आणि स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वचनबद्धता, समर्पण आणि अथक प्रयत्नांना आदरांजली वाहिली आहे.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात “१९४७ मध्ये आजच्या दिवशी आपल्या देशाने ब्रिटीश राजवटीखालील शतकानुशतके क्रूर गुलामगिरीतून स्वातंत्र्याचा प्रकाश पाहिला. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आपल्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. तेव्हापासून भारताने आपली विविधता स्वीकारण्यासाठी संघर्ष केला आहे आणि ती भावी पिढ्यांनी जपली पाहिजे.”

मुख्यमंत्री म्हणतात, आपल्या देशाने सर्व विकासात्मक क्षेत्रात जलद प्रगती केली आहे आणि सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या देशांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. गेल्या ६३ वर्षात, गोवा राज्याने देशाला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आम्ही राज्याचा व्यापक विकास साध्य करण्यासाठी काम करीत आहोत, ज्यामुळे राष्ट्र उभारणीत योगदान देत आहोत. राज्य सरकार सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करीत आहे ज्यामुळे लोकांना सामूहिक हितासाठी त्यांची वैयक्तिक क्षमता प्रकट करण्याची शक्ती मिळेल.”

“सरकारने लोककेंद्रित योजना राबवून त्यांना सार्वजनिक योजना आणि सेवांमध्ये साधे आणि पारदर्शक प्रवेश प्रदान करून लोकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे मुख्यमंत्री पुढे म्हणतात.

आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनानुसार, गोवा शेतीपासून उद्योगापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी दृढनिश्चयाने काम करीत आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देऊन, पारंपारिक कौशल्यांचे जतन करून आणि स्वदेशी उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन स्वदेशीची भावना जोपासण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपल्या वारशात रुजलेली ही स्वयंपूर्णता आपल्या लोकांना सक्षम बनवेल आणि विकसित भारताचा पाया मजबूत करील. निरोगी, समृद्ध आणि समतापूर्ण समाज असलेले राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण परिश्रमपूर्वक काम करूया.”

 “देशासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज आपण सर्व महान आत्म्यांना आदरांजली वाहतो. स्वतंत्र भारताबद्दलच्या त्यांच्या स्वप्नांना चिकटून राहून आपण या महान व्यक्तिमत्त्वांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करूया,” असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.