Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

राज्यपाल म्हणतात “आज आपण भारतीय राष्ट्रीय चळवळीतील आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे मनापासून कृतज्ञतेने स्मरण करतो. वसाहतवादी राजवटीपासून आपले मौल्यवान स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. त्यांच्या धैर्य आणि वचनबद्धतेमुळेच आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून उभा आहे.”

राज्यपाल पुढे म्हणतात, स्वातंत्र्य मिळाल्यापासून, भारताने चांद्रयान-३ सारख्या यशस्वी अंतराळ मोहिमा सुरू करण्यापासून ते जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपण आयटी, औषधनिर्माण, विज्ञान, उद्योग, शेती, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात जागतिक लिडर आहोत. आपली लोकशाही बळकट आहे, आपली तरुण पिढी नवोन्मेषी आहेत आणि जागतिक व्यासपीठावर आपला आवाज वाढलेला आहे. आपल्या भूतकाळापासून प्रेरणा घेत असताना आपण वर्तमानात परिश्रमपूर्वक काम केले पाहिजे आणि भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे ज्यामुळे आपण २०४७ पर्यंत भारताला एकता, नवोन्मेष आणि समावेशक विकासाने विकसित भारतात करू शकतील.

राज्यपाल म्हणतात, गोवा हे जरी लहान राज्य असले तरी गोवा राज्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. गोवा सुंदर समुद्रकिनारे, समृद्ध वारसा आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिध्द असल्याने गोव्यात दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. गोवा जैवविविधतेने नटलेला आहे, आपण आपल्या यशाचा उत्सव साजरा करत असताना, आपण आपली आर्थिक समृद्धी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे.

राज्य आणि देशाची एकता टिकवून ठेवण्यासाठी, प्रगतीसाठी काम करण्याचे आणि आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न साकार करणारे आणि आपले लोक आणि युवकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या विकसीत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची शपथ घेऊया असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.