गोवा खबर : १४ ऑगस्ट २०२५ रोजी मिनेझिस ब्रागांझा संस्थेने पणजी संस्थेच्या परिषद सभागृहात बहुभाषिक कवी संम्मेलनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण गोवा राज्यातून अनेक कवी या सम्मेलनात भाग घेणार आहेत. संध्या ३.३० वाजता सम्मेलनास सुरवात होईल.
प्रसिद्द साहित्यिक नयना आडारकर या सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव अशोक परब व इतर मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहतील.
सदर कार्यक्रमास साहित्यिक आणि विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.